सरकार कडक निर्णय का घेत नाही ?

0

मुंबई : मुंबईच्या मुलींच्या वसतीगृहात मंगळवारी सायंकाळी 18 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सरकार कडक भूमिका का घेत नाही, असे म्हणत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सरकारच्या भूमिकेचा निषेध केलाय.

या प्रकरणाला अनेक कंगोरे असून संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार वस्तीगृहातील अनेक बाबींवर जाणून-बुजून दुर्लक्ष केले गेले असल्याचे दिसून येते. या प्रकरणात सखोल चौकशी करून सर्व दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी देखील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. मुंबईतील मुलींच्या वसतीगृहात मंगळवारी संध्याकाळी एका अठरा वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणावर राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे.

मुंबईतील मुलींच्या वसतिगृहात मंगळवारी सायंकाळी 18 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला. बलात्कारानंतर मुलीची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात हॉस्टेलचा चौकीदार संशयित आरोपी होता, मात्र संशयित आरोपीनेही रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. पोलिसांना त्याचा मृतदेह चर्नी रोड रेल्वे ट्रॅकजवळ सापडला.

या प्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित चौकीदार कोण होता. त्याला कोणाच्या ओळखीने नोकरीवर घेण्यात आले होते. तरुणी चौथ्या मजल्यावर एकटी का राहत होती? वसतीगृहाचे दरवाजे अत्यंत तकलादू असल्याची माहिती मिळाली आहे. अशा सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याची आवश्यकता असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.