नुपूर शर्माला जो न्याय, तोच कोश्यारिंना का नाही? : उदयनराजे भोसले

0

पुणे : मराठा संघटना संभाजी ब्रिगेडसह अनेक संघटना आणि विरोधी पक्षांसह सर्वधर्मीय शिवप्रेमी पुणेकरांनी मंगळवारी पुणे बंद पाळला आहे. यादरम्यान मूकमोर्चा सुरू झाला आहे. डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण केल्यानंतर मूक मोर्चाला सुरुवात करण्यात आली, यामध्ये खासदार उदयनराजे भोसले हे देखील सहभागी झाले आहेत.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात हा मोर्चा काढण्यात आला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या अधिपत्याखाली एक-एका नेत्यांकडून सुनियोजित पद्धतीने महापुरुषाबद्दल हे बोलवून घेतले जात आहे. हे भाजपचे षंडयंत्र असल्याचा आरोप शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत कमालीचा आकस, राग, द्वेष आहे, असा आरोपही सुषमा अंधारेंनी केला आहे.

नुपूर शर्मांचे जसे निलंबन केले तसेच राज्यपाल कोश्यारींना का हटवले नाही, असा संतप्त सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्र सरकारला चिचारला आहे. तर नुपूर शर्मांला एक राज्यापालांना तोच न्याय का नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. पुण्यात राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात आज बंद ठेवण्यात आला होता. यावेळी काढलेल्या मोर्च्यातून खासदार उदयनराजे भोसले यांनी हा संतप्त सवाल केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी खस्ता खाल्ल्या. त्यांचे संपूर्ण आयुष्य त्यांनी स्वराज्यासाठी वेचले, असे असताना शिवरायांचा सन्मान व्हावा, हे सांगण्याची आज वेळ येते ही शोकांतिका आहे, अशी खंत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली.

पुण्यातील डेक्कन परिसरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास खासदार छत्रपती उदयनराजे यांनी पुष्पहार अर्पण केल्यानंतर निषेध रॅलीला सुरुवात झाली. यामध्ये शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, काँग्रेसचे नेते माजी आमदार मोहन दादा जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे, रूपाली ठोंबरे , प्रदीप देशमुख, संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे, विकास पासलकर, मुस्लिम मूलनिवासी मंचाचे अंजुम इनामदार सहभागी झाले. हा मोर्चा लाल महाल येथे आल्यावर खासदार उदयन राजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Leave A Reply

Your email address will not be published.