मुंबई ः ”अधिवेशन काळात संसंद गजबजले असते. पण, आता करोनाच्या नावाखाली मोदी सरकराने हिवाळी अधिवेशनच रद्द केले. अधिवेशने आणि चर्चा होणार नसतील, तर १ हजार कोटी उभा करून नव्या संसद भावनाचा घाट आणि थाट कशासाठी?”, अशा प्रश्न शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या ‘रोखठोक’ सदरातून उपस्थित केला आहे.
”संसद सधया बंद पडली आहे. त्यात कोणतेही काम होत नाही. तर, न्यायालयाचा आदेश डावलून १००० कोटींचे नवे संसद उभारले जात आहेत. देशात रशियासारखी परिस्थिती निर्माण होत आहे. कारण पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे नेते सांगताहेत. पुतिन यांनी सर्वसत्ताधीश होण्यासाठी कायदेच बदलले. संसदेचे महत्व कमी केले. विरोधकांना खतम केले. ब्रिटनमध्ये असे कधीच घडणार नाही! का? तर, ब्रिटनचे पंतप्रधान चार आठवडे आजारी होते. तो काळ सोडला तर, ब्रिटनच्या संसदेनेही प्रश्नोत्तराचा तास कधी टाळला नाही. जगातील १०५ देशांत संसदीय लोकशाही असून फक्त रशिया आणि भारतानेच संसदेते अधिवेशन घेण्याचे टाळले आहे”, अशा माहितीती त्यांनी दिली आहे.
”आधीच्या राज्यकर्त्याचे नामोनिशाण मिटवूण टाकायचे, नेहरु, शास्त्री, इंदिराजी, राजीव गांधी, मनमोहन सिंग, डाॅ. आंबेडकरांपासून लोहियापर्यंत सगळ्यांच्या आठवणी संपवाय आणि इतिहासाच्या पाऊलखुणा, ठसे संपवायचे आणि स्वतःचीच प्रतिमा निर्माण करणारे नवे दस्तएेवज, इमारती उभा करायच्या हा लोकशाहीचाच अतिरेक आहे, असे कोणालाच वाटत नाही”, अशा खंतही संजय राऊत यांनी व्यक्त केली.
संबंधित बातमी : नवे संसद आत्मनिर्भर भारताच्या निर्मितााचा साक्षीदार ठरेल ः मोदी