ट्रकने चिरडल्याने पत्नीचा मृत्यू; पती आणि दोन मुले जखमी

0

पुणे : वेगातील ट्रकने चिरडल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पती आणि दोन मुले जखमी झाले. हा अपघात
हडपसर परिसरात आज पहाटेच्या सुमारास झाला. लक्ष्मी प्रमोद मालुसरे (32) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे तर प्रमोद मालुसरे (38) हे गंभीर जखमी झाले आहेत. तर त्यांची दोन मुले किरकोळ जखमी झाली आहेत. हडपसर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. अपघातानंतर टँकर चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.

मालुसरे दांपत्य फुरसुंगी येथून भोर गावी निघाले होते. प्रमोद मालुसरे हे दुचाकी चालवत होते. पत्नी आणि दोन मुले पाठीमागे बसली होती. आज सकाळी साडेसातच्या सुमारास पुलावरून जात असताना पाठीमागून आलेल्या एका ट्रकने त्यांना जोराची धडक दिली. त्यानंतर दुचाकीवरून खाली पडलेल्या लक्ष्मी ट्रकच्या चाकाखाली सापडल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातात प्रमोद मालुसरे गंभीर जखमी झाले आहेत. तर त्यांची दोन लहान मुले किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपास पोलीस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.