पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापती पदासाठी भाजप पक्षाने डावलल्याने नाराज झालेले नगरसेवक रवी लांडगे यांनी तडकाफडकी स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
रवी लांडगे यांची नाराजी दूर करण्याचे आव्हान शहरातील पक्षप्रमुख म्हणून भाजपच्या नेत्यांपुढे आहे. रवी लांडगे यांनी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.
भाजपकडून स्थायी समिती सभापतीसाठी नितीन लांडगे यांचा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. या नंतर रवी लांडगे यांनी राजीनामा दिला आहे.पण एक दिवस निघुन गेल्याने महापौरांनी राजीनामा मंजूर केला नाही.त्यामुळे शहराच्या राजकारणात भाजपा पक्षश्रेष्ठी नगरसेवक रवी लांडगेची समजुत काढणार का? अशी चर्चा सुरू आहे.