मुंबई ः भाजपाचे काही नेते आमच्या संपर्कात, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच केले होते. याच पार्श्वभूमीवर पक्षांतराला सुरूवात झाली आहे, असे दिसत आहे. कारण, भाजपाचे आणखी एक नेते राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. कारण, भाजपाचे कल्याणराव काळे आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर दिसले.
भाजपाचे नेते कल्याणराव काळे आणि शरद पवार सरकोली येथील कार्यक्रमात एकत्र दिसून आले. यावेळी कल्याणराव काळे म्हणाले की, ”आपण यापुढे शऱद पवार जे सांगतील, त्या पद्धत्तीने काम करू. शरद पवार यांच्या मदतीमुळेच आज साखर कारखान्याचे धुराडे पेटले आहे.” असे विधान केल्यानंतर काळे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आल्याचे दिसत आहे.
”आमच्यापण काही चुका झाल्या. परंतु, शरद पवार यांनी कधीच दुजाभाव केला नाही. शेतकऱ्यांची कारखानदारी नीट चालावी, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळेच आज पंढरपुरातील विठ्ठाल, चंद्रभागा आणि भिमा गे कारखाने सुरू आहेत. आपण या पुढे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे”, असे कल्याणराव काळे यांनी सांगितले.