त्यामध्ये म्हटले आहे की , कोरोना महामारीचे संकट पुन्हा पिंपरी – चिंचवडकरांवर ओढावले आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे . आरोग्य व्यवस्था आणि प्रशासन आपआपल्या परीने या संकटाचा सामना करीत आहे . सर्वसामान्य नागरिक तणावात आहेत . अशी प्रतिकूल परिस्थिती असताना महाविरण प्रशासनाकडून अवाजवी बीलांची आकरणी केली जात आहे . बील भरणा न केल्यास कोणतीही पूर्वकल्पना न देता वीज पुरवठा खंडीत केला जात आहे .
त्यामुळे लघु उद्योजक , सामान्य नागरिक , गृहिणींमधून महाविरणविरोधात संताप व्यक्त होत आहे . त्यामुळे महावितरण प्रशासनाच्या अधिकारी – कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या भावना लक्षात घ्याव्यात . उन्हाळा सुरू झाला आहे , प्रत्येक घरात वीज अत्यावश्यक बाब आहे. आर्थिकदृष्ट्या संकटाचा सामनाही नागरिकांना करावा लागत आहे . त्यामुळे एक – दोन महिन्याचे बील निर्धारित वेळेत भरले नाही , म्हणून लगेच वीज कनेक्शन तोडून नागरिकांना त्रास देण्याची भूमिका प्रशासनाने घेवू नये. अन्यथा महावितरणविरोधात जनआंदोलन उभारण्यात येईल.