सुपरस्टार रजनीकांत राजकारणात प्रवेश करणार?

उद्या रजनी मक्कल मंदरम पक्षाच्या सचिवांना भेटणार

0

चेन्नई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतच्या समर्थकांनी या महिन्याच्या सुरुवातीलाच इच्छा व्यक्त केली होती की, रजनीकांत यांनी राजकारणापासून दूर राहण्याच्या निर्णयासंदर्भात पुनर्विचार करावा, असा आग्रह केला होता. त्याचा विचारात रजनीकांत आपल्या रजनी मक्कल मंदरम (आरएमएस) या पक्षाच्या जिल्हा सचिवांना भेटणार आहेत. परंतु, ती भेट ऑनलाइन होणार की प्रत्यक्ष, या गोष्टीची खात्री झालेली नाही.

रजनीकांत यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत उतरणार आहेत की नाही, हे अजून गुलदस्त्यातच आहे. मात्र, सूत्रांनुसार असं सांगण्याच आले आहे की, ही भेट ऑनलाइनच होण्याची शक्यता आहे. कारण, रजनीकांतच्या डाॅक्टरांनी कुठेही दौरा न काढण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी असं सांगितलं आहे की, रजनीकांत यांच्या किडनीची परिस्थिती पाहता त्यांना करोना विषाणुंचा संसर्ग होऊ शकतो. त्यानंतर रजनीकांत यांनी स्वतः सांगितले की, ”डाॅक्टरांचे हे पत्र, माझे नाही. माझ्यासाठी त्यांनी दिलेला सल्ला आहे.”

मागील दोन वर्षांमध्ये घडणाऱ्या घटनांवर रजनीकांत आपले मत देत आहेत. मात्र, सक्रीय राजकारणात येण्याचे ते टाळत आहेत. त्यांनी सांगितले आहे की, ”मी मक्कल मंदरम या पक्षाशी चर्चा करेन आणि योग्य वेळ आली की, राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा करेन.”

Leave A Reply

Your email address will not be published.