माझी बदनामी करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार : काळे

0

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी अमोल काळे यांच्यावर आरोप केले होते. काळे आणि भाजपचं साटंलोटं असून त्यांनी घोटाळे केल्याचाही आरोप करण्यात आला होता. काळे हे परदेशात पळून गेल्याचा दावाही काही राजकीय नेत्यांनी केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर काळे यांनी खुलासा केला आहे.

मी एक खासगी व्यावसायिक आहे. मी सरकारचं कोणतंही कंत्राट घेतलेलं नाही. तसेच माझ्याबाबतचा सर्व तपशील आयटीच्या विवरणात दिलेलं आहे, असं सांगतानाच मी परदेशात पळून गेल्याची काही लोकांनी अफवा पसरवली आहे. ज्यांनी ही अफवा पसरवली त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे, असं अमोल काळे यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

मी खासगी व्यावसायिक असून मुंबई क्रिकोट असोसिएशनचा उपाध्यक्ष आहे. गेले दोन दिवस काही नेत्यांची माझ्या संदर्भातील वक्तव्य पाहण्यात आली. ही सर्व वक्तव्ये पूर्णत: दिशाभूल करणारी आणि माझी बदनामी करणारी आहेत. महाराष्ट्र शासनाचं मी कोणतंही कंत्राट घेतलेलं नाही.

माझ्या खासगी व्यवसायाचे तपशील प्राप्तीकर विवरणात दिले आहेत. फक्त संभ्रम निर्माण करण्यासाठी माझी हेतू पुरस्सर बदनामी केली जात आहे. जे नेते माझी बदनामी करत आहेत, त्यांच्यावर मी कायदेशीर कारवाई करणार आहे, असं अमोल काळे यांनी म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.