केंद्र सरकार शेतकऱ्यांचे हित साधणार का ः राहूल गांधी 

0

नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात काॅंग्रेस नेते राहूल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढविला आहे. राहूल गांधी म्हणाले की, ”आता शेतकऱ्यांविषयी बोलण्याची वेळ आली आहे. हा विषय टाळून चालणार नाही”, अशा आशयाचे ट्विट करत ‘किसान की बात’ हा हॅशटॅग त्यांनी वापरला आहे.

राहूल गांधी म्हणाले की,”शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, उत्तन्न वाढले अंबानी आणि अदानी यांचे. शेतकरी विषयक काळ्या कायद्याला जे योग्य समजत आहेत, ते शेतकऱ्यांच्या हिताचे प्रकरण सोडविणार आहेत का,” असा प्रश्नही केंद्र सरकारला विचारला आहे.

शेतकरी आंदोलनाचा चौथा दिवस आहे. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील शेतकरी कायद्याच्या विरोधात आंदोलन छेडलेले आहे. बुराडी मैदानात आंदोलन करण्याचा केंद्र सरकारन दिलेला प्रस्ताव शेतकऱ्यांनी नाकारला आहे. ”जोपर्यंत शेतकरी कायदा मागे घेत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही,” असेही शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.