पुण्यातील राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या सोबत : प्रशांत जगताप

0

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माजी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांसोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. त्यानंतर मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे शहराची कार्यकारणी बैठक पार पडली.

यावेळी मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बैठकीस येऊन त्यांनी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यापुढील काळातही शरद पवार यांच्यासोबत राहतील असा निर्धार व्यक्त केल्याची माहिती पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली आहे.

यावेळी व्यासपीठावर खासदार वंदना चव्हाण, प्रवक्ते अंकुश काकडे, माजी आमदार जयदेव गायकवाड, माजी महापौर शांतीलाल सुरतवाला, रवींद्र माळवदकर, मृणालिनी वाणी यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

जगताप म्हणाले, पक्षातील मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे शरद पवार यांचा सोबत आहे. पवार यांचे शहर म्हणून पुणे ओळखले जाते. त्यांना पाठिंबा देण्याबाबत ठराव बैठकित मांडण्यात आला आहे. उद्या पुण्यातून ३५० कार्यकर्ते मुंबईला जाणार आहे. कायदेशीर पातळीवर लढाई पोहचले असल्याने प्रतिज्ञा पत्रावर पदाधिकारी यांचे म्हणणे घेतले जाणार आहे. जिल्ह्यातील आणि शहरातील सर्व आमदार आणि खासदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबत आहे. सर्वांना मेसेज दिले त्यांनी बैठकीस येणे आपेक्षित होते. परंतु वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे आणि हडपसरचे आमदार चेतन तुपे हे दोघे कामात व्यस्त असल्याने बैठकीस येऊ शकले नाही. शरद पवार यांचे प्रेमाखातर ते उद्या मुंबईत उपस्थित राहतील.अनेक कार्यकर्ते अजित पवार आणि शरद पवार यांच्या सोबत वर्षांनीवर्ष काम करत आहे. पुणे पक्ष कार्यालय हे प्रशांत जगताप या माझ्या नावाने करार बद्ध आहे त्यामुळे बळजबरीने त्याचा ताबा कोण घेऊ शकणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव सदर करारात नाही. संघ आणि भाजप विरोधात आम्ही यापुढे काम करत राहणार आहे. जे मंत्रिमंडळात आमचे सहकारी सहभागी झाले ,त्यांच्या विरोधात आम्हला यापुढे आंदोलन करावे लागेल. अद्याप कोणाला पक्षातून बडतर्फ करण्यात आले नसून आज २३ माजी नगरसेवक बैठकीत उपस्थित होते. मी विचारसरणी विरोधात जाणार नाही याचा निर्णय घेतला आहे. स्वतःचे आत्मभान जागृत ठेऊन स्वाभिमान शिल्लक राहून प्रत्येकाने लोकशाहीत निर्णय घ्यावा.

Leave A Reply

Your email address will not be published.