जमिनीच्या वादातून महिलेला कुटुंबासह एका वर्षासाठी बहिष्कृत

पुण्यात न्याय-निवडा जात पंचायतीचा निर्णय

0

पुणे : शिक्षणाचे माहेर घर असणाऱ्या पुणे शहरात आजही जुन्या रुढी परंपरा यावर न्याय निवडा केला जात असल्याचे समोर आले आहे. जमिनीच्या वादातून न्याय-निवडा जात पंचायतीने महिलेला कुटुंबासह एका वर्षासाठी बहिष्कृत केल्याची घटना घडली आहे. तसेच दंडापोटी जात पंचायतीने एक लाख रुपये, पाच दारू बाटल्या, पाच बोकडांची मागणी केली आहे. तसेच दंड न दिल्यास कायम स्वरूपी बहिष्कार टाकण्याची “जात पंचायतीची’ घोषणा केली आहे.

पुण्यात घडलेल्या या घटनेने संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासवड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. रिटा कुंभार या तरुणीने घनकवडी पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. त्यात मालमत्तेच्या वादातून हा प्रकार घडल्याचे नमूद करण्यात आले.

रिटा या मुलीच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांच्या संपतीचे वाटप करायचे होते. मात्र रिटाच्या वडिलांचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध होते. त्यावरून वाद मिटवायचा म्हणून जात पंचायत बोलावण्यात आली. मात्र त्याठिकाणी पैशे आणि बोकडांची मागणी केली गेली. त्यावरून शिवीगाळ देखील झाली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.