आत्महत्या करण्यासाठी महिलेची कॅनॉलमध्ये उडी; पुणे पोलिसांनी वाचवले प्राण

0

पुणे : सिंहगड रोडवरील तुकाई नगर येथे एका महिलेला आत्महत्या करण्यापासून वाचवत दोन पोलिसांनी धाडसी कामगिरी केली आहे. महिलेने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने कॅनॉलच्या पाण्यात उडी घेतली. पोलिसांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारुन महिलेचे प्राण वाचवले. ही कामगिरी सिंहगड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक शैलेश नेहरकर आणि पोलीस शिपाई लक्ष्मण विलास काशीद यांनी केली आहे. 27 वर्षीय महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज (सोमवार) सकाळी सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे अमलदार पोलीस शिपाई लक्ष्मण काशीद तसेच पोलीस नाईक शैलेश नेहरकर असे मिळून वडगाव मार्शल दिवस पाळी कर्तव्यावर होते. त्यावेळी त्यांना एमडीटीवर 10 वाजून 58 मिनिटांनी कॉल आला की, तुकाई नगर येथील कॅनॉल मध्ये एक महिला आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असून ताबडतोब पोलीस मदत हवी आहे. कॉल रिसीव करून काशीद आणि नेहरकर हे घटनास्थळी पोहचले.

त्यावेळी 27 वर्षीय महिला या कॅनल मध्ये उभी राहून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होत्या. दोघांनी तिला खूप समजण्याचा प्रयत्न केला परंतु ती महिला ऐकण्याच्या परिस्थिती नव्हती. तिला बोलण्यात व्यस्त करून त्यांनी फायर ब्रिगेडची मदत मागवली परंतु , फायर ब्रिगेड येण्याअगोदरच प्रतिक्षा यांनी पाण्यात उडी मारली.

वडगाव मार्शलचे अंमलदार पोलीस शिपाई काशीद यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कॅनल मध्ये उडी मारून तेथे जमलेल्या जमावातील एका इसमाच्या साह्याने महिलेस सुखरूप बाहेर काढले.

Leave A Reply

Your email address will not be published.