‘गुगल पे, फोन पे’द्वारे महिलेचा विनयभंग

0

पिंपरी : व्यक्तीची वर्तणूक सुरक्षित वाटल्याने त्याचा  नंबर महिलेने ब्लॉक केला. त्यामुळे व्यक्तीने महिलेला गुगल पेवर मेसेजकेले. तिथेही ब्लॉक केल्यानंतर त्याने फोन पेवर मेसेज केले. महिलेने संबंधित व्यक्तीला फोन पेवर देखील ब्लॉक करून थेटपोलिसात धाव घेतली. हा प्रकार 1 जून रोजी दुपारी तीन ते 2 जून रोजी सायंकाळी पावणे पाच वाजताच्या कालावधीत चिखली, सासवड येथे घडला.

याप्रकरणी पिडीत महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राकेश कुमार यदुवंशी (पूर्ण पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना काम देण्याबाबत सांगून फिर्यादीची इच्छा नसताना त्यांच्याशी जवळीकसाधली. फिर्यादीचे व्हिजिटिंग कार्ड घेऊन त्यावरील मोबाईल नंबरवर आरोपीने संपर्क केला. मात्र आरोपीची वर्तणूक सुरक्षित वाटल्याने फिर्यादी यांनी त्याचा मोबाईल नंबर ब्लॉक केला.

त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या गुगल पेवर अश्लील मेसेज केला. फिर्यादी यांनी गुगल पेवर देखील आरोपीला ब्लॉक केले. आरोपीतिथेही थांबला नाही. त्याने फिर्यादी यांच्या फोन पेवर अश्लील मेसेज करून त्यांचा विनयभंग केला. फिर्यादी यांनी आरोपीला फोन पेवरदेखील ब्लॉक करून थेट पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.