गुंगीच्या गोळ्या देऊन महिलेवर बलात्कार

0

पिंपरी : मुल होण्यासाठी म्हणून गुंगीच्या गोळ्या देत 25 वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे. पुढे तिचे अश्लिल फोटो काढून तिला धमकी देत आरोपीने वेळोवेळी अत्याचार केले. हा प्रकार 10 फेब्रुवारी 2021 ते एप्रिल 2022 या कालावधीत  भोसरी परिसरात घडला.

पिडीत महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी राजू नानाभाऊ गुलदगड (50 रा. चाकण) याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीतेची व आरोपीची 2019 मध्ये ओळख झाली. यावेळी पिडीतेने आपल्याला मुल होत नसल्याचे सांगितले. त्यावर आयुर्वेदिक उपाय असल्याचे सांगत आरोपीने पिडीतेला काही गोळ्या खाण्यास दिल्या.

या गोळ्या गुंगीच्या असल्याने  पिडीता झोपी गेल्या असता त्यांच्यावर आरोपीने बलात्कार केला. पुढे पिडीतेला त्यांचे फोटो दाखवून धमकी देत वेळोवेळी अत्याचार करण्यात आले. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.