वाराणसीत तोतया आयपीएस अधिकाऱ्याकडून महिलांची फसवणूक

0

वाराणसी : वाराणसी पोलिसांनी एका तोतया आयपीएस अधिकाऱ्याला अटक केली आहे. महिलांना मैत्रीच्या जाळ्यात अडकवून तो त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे काम करत होता.  अनेक महिलांची अखिलेश मिश्राने फसवणूक केली आहे आणि त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अखिलेश मिश्रा हा सोशल नेटवर्किंग साइट्सवर पोलीस गणवेशातील स्वतःचे फोटो पोस्ट करायचा. तसेच तो तरुणी आणि महिलांशी चॅटिंग करायचा. त्यांना मैत्रीच्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून पैसे उकळायचा. काही दिवसांपूर्वी अखिलेशने एका शिक्षिकेला मैत्रीच्या जाळ्यात ओढून तिची फसवणूक केली. शिक्षिकेला अखिलेशने आयपीएस अधिकारी असल्याचे सांगून १ लाख ६० हजार रुपयांना गंडा घातला. तिला शंका आल्यानंतर तिने कँट पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी कारवाई करत सोमवारी त्याला चौकाघाट परिसरातून अटक केली.

पोलीस चौकशी केली असता, अखिलेश याने रॉ अधिकारी असल्याचे सांगून अनेकांना गंडा घातलेला आहे,  अशी माहिती मिळाली. अखिलेश हा वाराणसीतील रोहनिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शहंशाहपूरचा रहिवासी आहे. सध्या अखिलेश पोलीस कोठडीत असून, त्याची चौकशी केली जात आहे. वाराणसीतील किती महिलांची अखिलेश याने फसवणूक केली आहे, याचा तपास केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.