कामगाराने मारला डल्ला; 17लाखाचे दागिने लंपास

0

 

पिंपरी : ज्वेलरी दुकानातून कामगाराने 17.03 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना सांगवी येथे 13 सप्टेंबरला घडली आहे.

याबाबत कैलास यादव वारे (47, मॅनेजर, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात 14 सप्टेंबर रोजी  फिर्याद दिली आहे.मंजुनाथ बिराजदार, (सध्या रा. पिंपळे गुरव) या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही चोरी 13 सप्टेंबर रोजी दुपारी 12.15 वा ते 2.30 च्या दरम्यान नवी सांगवी येथील सोनिगरा गोल्ड एल.एल.पी (एस. जे. पी. एल. सोनीग्रा ज्वेलर्स) त्यांच्या ज्वेलरी दुकानात घडली आहे.

फिर्यादी यांचे कामगार आरोपी याने सेल्समन म्हणून काम करीत असताना फिर्यादी व दुकानातील काम इतर कामगारांची नजर चुकवून हातचलाखी करून दुकानातील एकूण 17.03 लाख रुपये किंमतीचा  सोन्याचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.