बारावीची २३ तर दहावीची २९ एप्रिलपासून लेखी परीक्षा

0
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा (बारावी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) लेखी परिक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावीची २३ एप्रिल, तर दहावीची २९ एप्रिलपासून बोर्डाची परीक्षा सुरू होणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावी बोर्ड परीक्षा प्रचलित कालावधीत न करता एप्रिल-मेमध्ये त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक व कोकण या नऊ विभागीय मंडळाच्या दहावी-बारावी परिक्षा शासन मान्यतेनुसार एप्रिल-मेमध्ये घेण्यात येणार आहेत.

मंडळाच्या प्रसिद्धी पत्रकानुसार, बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत तर, दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत पार पडतील. परिक्षेचं संभाव्य वेळापत्रक दिनांकनिहाय www.mahassscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलं आहे.

प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी व अन्य विषयांच्या परीक्षांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर केले जाणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.