यशवंत जाधव यांची २४ तासांहून अधिक काळ चौकशी

0

मुंबई : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मुंबई महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या भायखळा येथील घरी शुक्रवारी आयकर विभागाच्या पथकाने धाड टाकली आहे.

गेल्या २४ तासाहून अधिक काळ झाडाझडती सुरू आहे. दरम्यान, मध्यरात्री आयकर विभागाचे अधिकारी यशवंत जाधव यांना घेऊन जाणार असल्याचे समजताच त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात जाधव यांच्या निवासस्थानाबाहेर गर्दी केली होती. तणावाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना समजावून त्यांना माघारी पाठवले. जाधव यांच्याबरोबरच त्यांचे निकटवर्तीय असलेल्यांवर २५ ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे. आयकर विभागाने यावेळी अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्रे हस्तगत केली आहेत.

कोलकाता येथील शेल कंपन्यांमध्ये यशवंत जाधव आणि त्यांची पत्नी आमदार यामिनी जाधव यांनी आर्थिक व्यवहार केल्याचे प्राप्तिकर विभागाच्या चौकशीतून समोर आले होते. यामिनी जाधव यांनी प्रतिज्ञापत्रात प्रधान डीलर्स नावाच्या कंपनीकडून १ कोटीचे कर्ज घेतले होते असा उल्लेख होता. मात्र या शेल कंपनीच्या माध्यमातून पुढे १५ कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय प्राप्तिकर विभागाला असून यात कर चुकवला गेला आहे का याचा तपास करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.