राज्यातील 14 जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी

0

मुंबई : मुंबईसह राज्यभरात जोरदार पावसाने बॅटींग करण्यास सुरूवात केली आहे. मुसळधार पावसामुळे नदी व नाले दुथडी भरून वाहत आहेत. बुधवारी संध्याकाळपासून पावसाने राज्याच्या अनेक भागांत जोर धरला आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत आहे. अशातच हवामान विभागाकडून राज्यातील 14 जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबई, ठाणे शहरांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. तसेच माथेरान आणि रायगड परिसरालाही पावसाने झोडपून काढले आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईला रविवार 11 सप्टेंबरपर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्याच्या अनेक भागांत ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ढगफुटीसदृश्य पावसामुळे नागरिकांच्या घरामध्ये पूराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन दिवसांत राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, 8 सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर अधिक वाढणार आहे.

राज्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, राज्याच्या विविध भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. गेली काही दिवस पावसाने उघडीप दिली होती. मात्र, पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे.

याशिवाय, पुणे, सातारा, रायगड, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांच्या काही भागात गेल्या काही दिवसांत झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना आवश्यक ती मदत तातडीने पुरविण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.