‘तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही’

0

मुंबई : मुंबईतील सोमय्या ग्राऊंडवर भाजपच्या बुस्टर डोस सभेत बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष केले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, मशीदीवरील भोंगे काढायला सांगितले तर ते झालं नाही आणि म्हणतात आम्ही बाबरी पाडली. हिंदू कधी मशीद पाडूच शकत नाही. तो ढाचा होता ते पाडण्याचं काम आम्ही अभिमानानं केलं. तो ढाचा पाडताना देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी होता. याच राम मंदिरासाठी सेंट्रल जेलमध्ये मी 18 दिवस घालवले आणि तुम्ही आम्हाला विचारता. बाबरी पडली तुम्ही कुठे होता? असा सवाल त्यांनी शिवसेनेला केला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काही लोकंचा, काही लोकांचा गैर समज आहे की, ते म्हणजे महाराष्ट्र आहे. त्यांचा अवमान म्हणजे महाराष्ट्राचा अवमान, त्यांचा सन्मान म्हणजे महाराष्ट्राचा सन्मान. मी त्यांना नम्रपणे सांगू इच्छितो, लक्षात ठेवा तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. महाराष्ट्र म्हणजे 18 पगड जातीच्या 12 कोटी लोकांनी जो प्रदेश समृद्ध केला आहे. तो प्रदेश म्हणजे महाराष्ट्र, त्याचा सन्मान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मान. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही आणि आज हेही सांगण्याची वेळ आली आहे की, तुम्ही म्हणजे, हिंदू नाही… पण मी हे म्हणणार नाही. कारण मला हिंदूंची संख्या कमी करायची नाही.

फडणवीस पुढे म्हणाले, आता महाराष्ट्रात हनुमान चालीसा म्हटलं तर राजद्रोह होतो. माझा तुम्हाला सवाल आहे की तुम्ही रामाच्या की रावणाच्या बाजूचे आहात. याचा निकाल तुम्ही लावा. काश्मीरमध्ये म्हणतात तुम्ही मेहबुबा मुफ्तींसोबत गेले. हो आम्ही गेलो कारण तेव्हा गरज होती. पाकिस्ताननं म्हटलं होतं की तिथं निवडणुका होऊ देणार नाही. पण आम्ही सरकार स्थापन करुन दाखवलं. जेव्हा आमचं काम झालं तेव्हा त्याच मुफ्तींचं सरकार खाली खेचण्याचं काम आम्ही केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.