नवी दिल्ली : लवकरच नागरिकांना ड्रायव्हिंग चाचणी शिवाय ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकणार आहे. त्यासाठी रस्ते परिवहन मंत्रालयाने मान्यता दिलेल्या ड्रायव्हिंग टेस्ट सेंटरकडून ट्रेनिंग घ्यावे लागेल, त्यानंतर केंद्राकडून प्रमाणपत्र मिळेल. त्या आधारे ड्रायव्हिंग लायसन्स घेताना चाचणी देण्याची गरज भासणार नाही. ही अधिकृत टॅनिंग सेंटर्स 1 जुलै 2021 पासून सुरू होतील. रस्ते वाहतूक मंत्रालयाने याबाबत आदेश जारी केले आहेत.
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार सध्या देशात 22 लाख वाहनचालकांची कमतरता आहे. ही कमतरता दूर करण्यासाठी आणि रस्ते अपघात कमी करण्यासाठी रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने मार्गदर्शक तत्वांनुसार देशभरात ड्रायव्हर ट्रेनिंग सेंटर्स सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मंत्रालयाच्या मानकांनुसार लोकं ही सेंटर्स उघडू शकतात, ज्यामध्ये लोकांना ट्रेनिंग दिले जाऊ शकते. ट्रेनिंग घेतल्यानंतर टेस्ट घेतली जाईल. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांना हे प्रमाणपत्र देईल, त्या आधारे टेस्ट न देता ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकेल.
ट्रेनिंग सेंटरसाठी मैदानात दोन एकर आणि डोंगराळ भागात एक एकर जागेची आवश्यकता असेल. एलएमव्ही आणि एचएमव्ही दोन्ही वाहनांसाठी सिम्युलेटर अनिवार्य असेल, ज्याद्वारे ट्रेनिंग दिले जाईल. येथे बायोमेट्रिक अटेंडेंस आणि इंटरनेटसाठी ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी आवश्यक असेल. पार्किंग, रिव्हर्स ड्रायव्हिंग, डाउनहिल ड्रायव्हिंग इत्यादी ट्रेनिंग देण्यासाठी ड्रायव्हिंग ट्रॅक अनिवार्य असेल. यामध्ये थिअरी आणि सेगमेंटेशन कोर्स असतील. केंद्रातील सिम्युलेटरच्या मदतीने हायवे, ग्रामीण भागात गर्दी आणि लेन असणाऱ्या ठिकाणी पाऊस, धुके तसेच रात्री वाहने चालविण्याचे ट्रेनिंग दिले जाईल.