ड्रग्स प्रकरणात भाजपच्या युवा महिला पदाधिकाऱ्याला अटक

0
अलीपूर : बॉलीवूड ड्रग्स नंतर आता राजकारणात ड्रग्स प्रकरण समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय जनता पक्षाच्या एका युवा महिला कार्यकर्तीला आणि तिच्या साथीदाराला अटक केली आहे. संबंधित  महिला कार्यकर्त्याच्या कारमधून लाखो रुपयांचा अवैध कोकेन पोलिसांनी जप्त केला आहे.

भाजप युवा मोर्चाच्या पर्यवेक्षक आणि हुगली जिल्ह्याच्या महासचिव पामेला गोस्वामी यांना कोलकात्याच्या नवीन अलीपूर येथून अटक करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून लाखो रुपयांचा अवैध कोकीन जप्त केलं आहे. यावेळी पोलिसांनी पामेला गोस्वामी यांच्या प्रबीर कुमार डे या साथीदारालाही अलीपूर परिसरातील एनआर एव्हेन्यु येथून अटक केली आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे.

भाजपाची युवा कार्यकर्तीला नशेच्या आहारी गेल्याची माहिती पोलिसांना अगोदर पासूनच होती. पोलिसांनी रस्त्यावर तपासणी सुरू असताना पामेला यांची कार थांबवली. यावेळी त्यांच्या कारची आणि बॅगची झडती घेतली असता. पोलिसांना 100 ग्रॅम अवैध कोकेन मिळालं. या कोकेनची बाजारात लाखो रुपये किंमत आहे. यावेळी तिच्यासोबत केंद्रीय सुरक्षा दलातील एक जवानही होता.

Leave A Reply

Your email address will not be published.