पुणे : फेसबुकच्या माध्यमातून ओळख झालेल्या एका महिलेने 20 वर्षीय तरुणाला स्वत:चे प्रेमाचे जाळयात ओढून त्याला माझ्यासाेबत शारिरिक संबंध ठेव मागणी केली. तसेच त्याला वारंवार पैशांची मागणी करुन पैसे न दिल्यास तुझी बदनामी करेल अशी धमकी दिल्याने सदर तरुणाने आळंदी परिसरातील शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे.
सदर तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी संबंधित महिला त्रास देऊन सतत पैशांची मागणी करत असल्याची माहिती बहिणीला फाेन करुन दिली हाेती. 18 नाेव्हेंबर ते चार डिसेंबर यादरम्यान सदर महिलेने तरुणासाेबत फेसबुकवर अशलील चॅट करुन त्याला शारिरिक संबंध ठेव मागणी केली.तसेच पैसे न दिल्यास नातेवाईक, कुटुंबीय यांना फेसबुकवरील मेसेज पाठविण्याची धमकी देऊन बदनामी करेल असे सांगितल्याने तरुणाने आत्महत्या केली आहे. याबाबत पुढील तपास आळंदी पाेलीस करत आहेत.