पिंपरी : चाकण परिसरात गावठी पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या एका तरुणास अटक करून त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कामगिरी चाकण पोलिसांनी केली आहे.
किशोर दत्तात्रय पाटे (23, रा. एकतानगर, चाकण) याला अटक करण्यात आलेली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; चाकण येथील डायमंड हॉटेल जवळील रस्त्यावर एकजण पिस्तुल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक वैभव शिंगारे यांना मिळाली. त्यांनी तपासी पथकास कारवाईचे आदेश दिले.
पोलिसांनी संशयित तरुणास ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला पिस्तुल आणि त्यामध्ये किवग काडतुसे आढळून आली.
ही कामगिरी वरिष्ठ निरीक्षक वैभव शिंगारे, अनिल देवडे (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विक्रम गायकवाड, अंमलदार सुरेश हिंगे, ऋषीकेश झनकर, संदीप सोनवणे, हनुमंत कांबळे, भेरोबा यादव, निखिल शेटे, अशोक दिवटे या पथकाने केली आहे.