लहान मुलांसाठी येणार ‘झायडस कॅडिला’याची लस

0

नवी दिल्ली : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना मोठा धोका वर्तविण्यात येत आहे. यामुळे आता मुलांना लसीकरण करण्यासाठी हालचाली सुरु आहेत. १२ ते १८ वर्षे या वयोगटातील मुलांसाठी लवकरच झायडस कॅडिलाच्या लसीला मंजुरी देण्यात येणार असल्याचं केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात सांगितलं आहे.

भारत बायोटेकची कोरोना प्रतिबंधात्मक लस कोवॅक्सिनची २ ते १८ वर्षांवरील मुलांवर वैद्यकीय चाचणी सुरू करण्यात आली आहे. देशातील जवळपास ५४ टक्के जनता खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेते, तर ४५ टक्के जनता सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असल्याचंही सरकारनं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

इतिहासातलं सर्वात मोठी लसीकरण मोहीम वेगानं सुरू आहे. तसंच दुरच्या प्रदेशांपर्यंतही ही मोहीम पोहोचली असल्याचं केंद्रानं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. केंद्र सरकारनं लसीकरणाच्या धोरणावर ३७५ पानांचं प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात दाखल केलं आहे. १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी १८६.६ कोटी डोसेसची आवश्यकता आहे जी जवळपास ९३-९४ कोटी आहे, २५ जूनपर्यंत देशात ३१ कोटी लसींचे डोस देण्यात आल्याचंही सांगण्यात आलं.

जानेवारी २०२१ ते जुलै २०२१ या कालावधीत भारतात ५१ कोटी डोस उपलब्ध होती. तसंच ऑगस्ट २०२१ ते डिसेंबर २०२१ पर्यंत १३५ कोटी लसींचे डोस उपलब्ध होती. यापैकी कोविशिल्डचे ५० कोटी, कोवॅक्सिनचे ४० कोटी, बायोलटजिकल ईचे ३० कोटी, झायडस कॅडिलाचे ५ कोटी आणि स्पुटनिक व्ही चे १० कोटी डोस उपलब्ध होणार असल्याचं सरकारनं सांगितलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.