आमदार संजय शिरसाट यांना रुग्णालयातून ‘डिस्चार्ज’

0

मुंबई : आमदार संजय शिरसाट यांना आज शुक्रवारी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यांच्यावर हृदयविकाराचे उपचार सुरू होते.

शिरसाटांना औरंगाबादमध्ये हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यामुळे सिग्मा रुग्णालयात उपचार करून त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आमदार शिरसाटांना सोमवारी, 17 ऑक्टोबर रोजी रात्री हृदयाचा त्रास जाणवू लागला. त्यांच्यावर औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात उपचार करण्यात आले. येथे डॉक्टर उन्मेष टाकळकर आणि त्यांच्या टीमने उपचार केले. त्यानंतर शिरसाट यांना पुढील उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आमदार संजय शिरसाट यांची मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. शिरसाट हे एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जातात. मात्र, नव्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती. त्यांनी मध्यंतरी तसे एक ट्विटही केले होते. मात्र, ते ट्विट त्यांनी डिलिट केले. ते चुकून केले गेले, अशी सारवासरावही केली होती.

औरंगाबाद पश्चिम हा संजय शिरसाटांचा मतदार संघ आहे. ते 2009 मध्ये पहिल्यांदा निवडून आले. सलग तीन वेळेस त्यांनी येथून विजय मिळवला. खरे तर त्यांची राजकीय वाटचाल 1985 मध्ये शिवसेनेचे शहर संघटक म्हणून सुरू झाली. त्यांनंतर 1995 मध्ये युतीच्या सत्तेत मराठवाडा औद्योगिक विकास महामंडळाच्या सदस्यपदी निवड झाली. ते 2000 मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले.

Leave A Reply

Your email address will not be published.