पिंपरी : भाजप सोबत सत्तेत शामील होण्यासाठी रोहित पवारच आग्रही होते, असा गौप्यस्फोट करणाऱ्या आमदार सुनील शेळकेंनारोहित पवार यांनी प्रतिउत्तर दिले आहे. काही नेते ठरवून मला ‘ट्रोल‘ करत आहेत. आमदार शेळके यांनी केलेले आरोप म्हणजे हास्यास्पदअसल्याचे सांगितले. तर सुनील शेळके यांनी भाजपच्या मदतीने स्वतःवर असलेल्या संकटातून बाहेर पडावे असा सल्ला वजा टोलाहीलगावला.
रोहित पवार हे चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. रोहित पवार म्हणाले; माझी शरद पवार यांच्यासोबतच बैठक झाली नाही तरनरेंद्र मोदी यांच्यासोबत बारा वेळा, अमित शहा यांच्यासोबत तीस वेळा, बराक ओबामा यांची देखील वेळ घेण्याचा प्रयत्न केला, तीमिळाली नाही. त्यानंतर मी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत तीन वेळा बैठक घेतली या सर्व बैठकी झाल्यानंतर मला एक गोष्ट कळली तीम्हणजे भाजपचे नेते हे हेकेखोर आहेत.
सुनील शेळके यांना त्यांच्या मतदारसंघात अनेक अडचणी आहेत हे विसरू नये असा इशाराही रोहित पवार यांनी दिला आहे. सुनीलशेळके यांचे वक्तव्य हे हास्यस्पद आहे. भाजपच्या विरोधात मी खूप बोलत असल्याने सत्तेत शामिल झालेल्या पैकी चार ते पाचआमदारांनी रणनीती आखली. ते मला टार्गेट करत आहेत. परंतु, त्यांना माझे एक आवाहन आहे की त्यांनी टार्गेट करत असताना अभ्यासकरून टार्गेट करावं. सुनील शेळके हे भाजपामधून राष्ट्रवादीत आलेले आहेत तिथे अशाप्रकारे वक्तव्ये करत आहेत. असं देखील रोहितपवार यांनी म्हटलं आहे.
मतदार संघातील कामे मंजूर करण्यासाठी अशा पद्धतीने काही नेते ब्लॅकमेल करत आहेत, मात्र ते कुठले नेते अजून मला कळालं नाही. ते थोडा शोधावं लागेल. पण जे नेते पवार साहेबांबरोबर तीच 35 वर्ष पुरोगामी विचाराच्या बाजूला होते पण आता दुसऱ्या विचारलागेलेले आहेत. त्यातलेच काही नेते अशा पद्धतीचे ब्लॅकमेल करत आहे आणि त्याच्यामुळेच काही आमदारांनी कदाचित आत्ताच्याकाळामध्ये सही केली असावे. आता विकास निधीसाठी तुम्ही जर अशा पद्धतीने ब्लॅकमेल करणार असाल तर हे योग्य नाही.
त्याच्याच बरोबर माझ्या मतदारसंघांमध्ये दोन मोठे हॉस्पिटल शासकीय हॉस्पिटलचे काम सुरू आहे. ते सुरू असताना अजून पर्यंत एकरुपया निधी दिला गेला नाही. मी सरकारला चॅलेंज करतो, सरकारला आव्हाने करतो. जर येत्या काळामध्ये तिथं असणारा हॉस्पिटलचाकाम जर इनकम्प्लिट राहिलं, पूर्ण नाही झालं आणि सामान्य कुटुंबातील एखादी व्यक्ती दगावला तर त्याची संपूर्ण जबाबदारीशासनाची, आत्ताचे भपकेबाजी करणारे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची असेल.