पिंपरी : खेड येथील सावरदरी गावात जमिनीच्या वादातून दोन कुटुंबा विरोधात पररस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. हो घटना गुरूवारी (दि.26) घडली. पहिल्या प्रकरणात रमेश सोपान बुचुडे (55, रा. सावरदरी, ता खेड, पुणे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाजीराव विठ्ठल बुचुडे, गणपत विठ्ठल बुचुडे, शहाजी गुलाब बुचुडे, मनोज गुलाब बुचुडे यांना अटक करण्यात आली असून अक्षय हनुमंत कुऱ्हाडे, सुभद्रा बाजीराव बुचुडे, वंदना गणपत बुचुडे, शकुंतला गुलाब बुचुडे, गुलाब बबन बुचुडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रमेश यांना एमआयडीसीने परतावा म्हणून पीएटी प्लॉट 136 दिला आहे. याठिकाणी फिर्यादी कंपाउंडचे खोदकाम करत असताना आरोपींनी खोदकाम थांबवले. ‘जोपर्यंत एमआयडीसीवाले आम्हाला सांगत नाही तोपर्यंत याठिकाणी काम करायचे नाही’, असे म्हणून फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ करून मारहाण केली.
दुसऱ्या प्रकरणात बाजीराव विठ्ठल बुचुडे (42, रा. सावरदरी, ता खेड, पुणे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रमेश सोपान बुचुडे, बाळू रमेश बुचुडे, अविनाश अंकुश कदम व अजिंक्य अंकुश कदम यांना अटक करण्यात आली आहे. तर, सागर रमेश बुचुडे, पंडित तुकाराम बुचुडे, अंकुश तुकाराम बुचुडे, लक्ष्मीबाई तुकाराम बुचुडे, रवींद्र रमेश बुचुडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाजीराव विठ्ठल बुचुडे यांच्या मालकीच्या जमिनीत आरोपी यांनी बेकायदा गर्दी जमवून शिवीगाळ व दमदाटी करत फिर्यादी आणि त्यांच्या घरच्यांना मारहाण केली, असे फिर्यादीत म्हंटले आहे.