पिंपरी : पतीला मारण्याची धमकी देत विवाहित महिलेला कारमध्ये बसवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्यावर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 9 ऑक्टोबर 2021 ते 31 सप्टेंबर 2022 या कालावधीत निगडी, आकुर्डी भागात वेळोवेळी घडला आहे.
अख्तर वाजिदअली शेख (38 ,रा. रुपीनगर, तळवडे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने रविवारी (दि. 30) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीस त्याच्या कारमध्ये बसवून कार रस्त्याच्या बाजूला उभी करून फिर्यादीवर लैंगिक अत्याचार केला. तुझ्या पतीला सोडून दे, मी तुला आयुष्यभर सांभाळतो असे आरोपीने फिर्यादीस म्हटले.
झालेला प्रकार कोणाला सांगितला तर तुझ्या पतीला जीवे मारीन,अशी आरोपीने धमकी दिली. फिर्यादीस ब्लॅकमेल करून वारंवार भेटायला बोलावून त्यांच्या पतीला घडलेला प्रकार सांगण्याची धमकी देत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.