पुणे शहरात शुकशुकाट; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

0

पुणे: पुण्यात विविध संघटना आणि राजकीय पक्षांनी एकत्र येत पुणे बंदची हाक दिली आहे. त्यानुसार आज मंगळवारी (दि. 13 डिसेंबर) पुणे शहर बंद ठेवण्यात आले आहे. या बंदला नागरिकांनी आणि दुकानदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पुण्यात सर्व दुकाने आणि आस्थापना बंद आहेत. पुण्यातील रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळत आहे. तसेच जागोजागी पोलीस देखील तैनात आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधाने केल्याच्या निषेधार्थ पुण्यात बंद पाळला जात आहे.

या मूक मोर्चात शहरातील आणि इतर भागातील हजारो शिवप्रेमींनी सहभागी झाले आहेत. छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून हा मोर्चा सुरू होणार झाला. अलका चित्रपटगृह (लो. टिळक चौक), लक्ष्मी रस्ता, बेलगाव चौक मार्गे लाल महाल येथे जाहीर सभेने या मोर्चाचा समारोप होणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या राजकीय पक्षांनी या बंदला पाठिंबा दिला आहे. संभाजी ब्रिगेड व अन्य सामाजिक, स्वयंसेवी संस्था, संघटना, व्यापारी महासंघ, गणेशोत्सव मंडळे यांनी देखील पुणे बंदला पाठिंबा जाहीर केला आहे.

छत्रपती उदयनराजे भोसले मोर्चात सहभागी झाले आहेत. शहरातील अनेक गणेशोत्सव मंडळांचा पाठिंबा देखील या बंदला आहे. भाजपचे लोक आणि नेते सातत्याने शिवाजी महाराज आणि राज्यातील महापुरुषांचा अपमान करत आहेत, त्यामुळे त्यांच्या विरोधात निषेध नोंदविण्यासाठी हा बंद पुकारल्याचे संयोजकांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.