पुणे : लग्न करण्यास नकार दिल्याने पुण्यातील एका पोलीस अधिकारी महिलेचे फोटो आणि व्हिडिओ फेसबुक वर व्हायरल केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी २८ वर्षीय महिला अधिकाऱ्यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार बीडमधील सिध्दांत भगवानराव जावळे (३०) याच्यावर विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी हा महिलेचा मित्र आहे. फिर्यादीने संबंधित तरुणाला लग्न करण्यासाठी नकार दिल्याने रागाच्या भरात त्याने फिर्यादी चे आणि स्वतःचे एकत्र असलेले फोटो, व्हिडीओ सर्वांना दिसतील अशा उद्देशाने फेसबुक वरून प्रसारित केले.
फिर्यादी या पुणे पोलीस दलात उपनिरीक्षक आहेत. आरोपी सिद्धांत हा त्यांचा मित्र आहे. त्याने फिर्यादी यांच्याकडे लग्नाबाबत मागणी घातली होती. पण, तो सतत घेत असलेला संशय व विचित्र वागण्यामुळे त्याच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. यानंतर त्याने आणखी त्रास देण्यास सुरुवात केली तसेच पैशांची मागणी करत असे.
त्यानंतर त्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले व त्याचा एक व्हिडिओ तयार करून तो फिर्यादी यांच्या नातेवाईक आणि इतर मैत्रिणींना दिसेल अशा पध्दतीने प्रसिद्ध केला आहे. यापूर्वी देखील एक गुन्हा लोणीकंद पोलीस ठाण्यात दाखल आहे. आता हा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.