पोटनिवडणुकीत हरतो आणि संपूर्ण राज्य जिंकतो : मुख्यमंत्री शिंदे

0

 

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत तुफान फटकेबाजी केली. भाजप पोटनिवडणुकीत हरतो आणि अख्खे राज्य जिंकतो. यूपीमध्ये भाजप चार पोटनिवडणुका हरला. मात्र, हे लोकसभेत हरले. कारण हे पोटनिवडणुकीत हरतात आणि अख्खे राज्य जिंकतात, अशा शब्दांत त्यांनी कसबा निवडणुकीवर भाष्य केले. डिस्टन्स एज्युकेशन समजू शकतो. मात्र, आम्ही डिस्टन्स अॅडमिन्स्ट्रेशन अनुभवले म्हणत, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टोलेबाजी केली. तर साखर झोपेतल्या शपथविधीच्या पुढची सुरस कथा देवेंद्र फडणवीस सांगतील तेव्हा शॉक बसेल म्हणत अजित पवारांना चिमटा काढला.

एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत मोकळ्या-ढाकळ्या शैलीत जोरदार भाषण ठोकले. ते म्हणाले, हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. सीएम रोडशो करतात, असे अजित पवार म्हणाले. मात्र, शरद पवारांनी सभा घेतल्या. ग्रुपला बोलावले. तुम्ही गाडी बदलून कुठे – कुठे गेलात? हे सगळे माहिती आहे. रात्री तीन वाजता आमच्याकडे फोटो आला होता.

एकनाथ शिंदे म्हणाले, मोदींनी रोड शो केला आणि राज्य जिंकले. राहुल गांधींनी रोड शो केला आणि तिन्ही राज्य गेले. आठवले यांच्या पक्षाचे दोन आमदार आले. तुमचे मात्र, बेगाने शादी में अब्दुला दिवाना सुरू आहे. कसबा येथे चुका झाल्या आहेत. त्या आम्ही येणाऱ्या काळात दुरुस्त करू. आमच्या कामाने मते जिंकू. मात्र, येणाऱ्या काळात निवडणुकात आहेत. तुम्ही तिघे आहात. एकाची पार्टी उभी राहिली, तर दुसरा भजन करत बसेल का?

एकनाथ शिंदे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी प्रयत्न सुरू आहेत. गेल्या सरकारमध्ये दावोसमधून दहा हजार कोटींचीही गुंतवणूक नाही. मात्र, या वर्षी दावोसमध्ये महाराष्ट्राचा उदो उदो सुरू होता. सरकारने अनेक कामांना चालना दिली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठिशी आहोत. कांद्याची नाफेडच्या माध्यमातून खरेदी सुरू झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सुरू केला. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या जनतेला फायदा होतो आहे. मेट्रोच्या दोन प्रकल्पांचा शुभारंभ केला. शेतकऱ्यांना मदत दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.