मार्केटयार्ड मध्ये उचभ्रू जुगार अड्यावर छापा; माजी नगरसेवक, प्रतिष्ठीत व्यक्ती ताब्यात

0

पुणे :  मार्केटयार्ड येथील एका बंगल्यात सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे. पोलिसांनी पुणे शहरातील प्रतिष्ठीत व्यक्ती तसेच पिंपरी चिंचवड शहरातील माजी नगरसेवकासह 19 जणांना ताब्यात घेऊन 53 हजार रुपयांची रोकड व चार दुचाकी असा दीड लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना या जुगार अड्डयाची माहिती मिळाली होती. त्यांनी आदेश दिल्यानंतर ही कारवाई झाली आहे. याप्रकरणी चेतन सतिश राजपुत (32, रा. 958, राष्ट्रभुषण चौक, शुक्रवार पेठ), भुष सतिश रूणवाल (39, रा. सर्व्हे नं. 48, गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रोड, पुणे), दाऊद शाबुद्दीन दलवी (36, रा. महादेवनगर, कात्रज-कोंढवा रोड, पुणे), बाजाली भागवत डोंगरे (39, रा. सर्व्हे नं. 48, गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रोड, पुणे), सुरज जगन्नाथ पासी (41, रा. सर्व्हे नं. 110/111, शांतीनगर, येरवडा), रविंद्र बाबु जाधव (39, रा. गुलटेकडी औद्योगिक वसाहत, गणपती मंदिरासमोर, पुणे), वैभव अशोक मंत्री (48, रा. 238, बुधवार पेठे, तुळशीबाग,पुणे), अविनाश कृष्णा जाधव (59, रा. 677, घोरपडीपेठ, पुणे), प्रसाद शंकर शेट्टी (48, रा. शिवशांती निवास, सर्व्हे नं. 24, प्लॉट नं. 183, प्राधिकरण निगडी, पुणे), राकेश अरूण कोंढरे (40, रा. साईनगर, कोंढवा), जावेद मोहम्मद शेख (45, रा. 3/24, महर्षीनगर, पुणे), प्रेमनाथ राम माने (44, रा. कात्रज गाव, शंकर मंदिराजवळ,पुणे), विशाल जालिंदर नरसाळे (26, रा. बी 93/5, सुपर बिबवेवाडी), भानुदास पांडुरंग सुरवसे (44, रा. कात्रज गाव, शंकर मंदिराजवळ), सचिन शिवाजी जाधव (24, रा. शास्त्री चौक, थाम हाऊस, भोसरी), राजेंद्र स्वामीनाथ हंचाटे (40, रा. 36, नवनाथ नगर, धनकवडी, पुणे), आकाश सुनिल कंडारे (29, रा. 13, पाच बिल्डींग, ताडीवाला रोड,पुणे), नितीन रणजित शिंदे (29, रा. हरपळे वस्ती, फुरसुंगी, गणेश मंदिरा शेजारी, पुणे) आणि वसंत मिस्त्रीलाल पारख (58, रा. साई अंगन, प्लॉट नं. 26, सर्व्हे नं. 589/बी, विद्यासागर कॉलनी, मार्केटयार्ड,पुणे) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. याबाबत मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मार्केटयार्ड परिसरातील विद्यासागर कॉलनीत विपूल बंगला आहे. या ठिकाणी जुगार सुरु असल्याची माहिती माहिती पोलीस आयुक्तांना समजली. पोलिसांचे पथक याठिकाणी गेले असता बंगल्याला कुलूप दिसले. त्यांनी खिडकीतून पाहिल्यानंतर आत जुगार सुरू असल्याचे दिसून आले. पोलिसांनी खिडकीतून चौकशी केली. तर हर्षल याने याच्या सांगण्यावरून येथे जुगार खेळण्यास आलो असून, तो जेवण आणून देतो असे म्हणूम बाहेर गेला आहे, अशी माहिती मिळाली.

पोलिस पथकाने हा प्रकार परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांना सांगितला. त्यांनी लागलीच येथे धाव घेतली आणि कुलूप तोडून कारवाईचे आदेश दिले. पथकाने कुलूप तोडून आत प्रवेश करत कारवाई केली. कारवाईत 19 जण मिळून आले आहेत. त्यात 53 हजार 900 रुपयांची रोकड आणि चार दुचाकी असा एकूण दीड लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.