पोटच्या मुलानेच केला वडिलांचा निर्घृण खून

0

पुणे : राजगुरुनगर येथे पोटच्या मुलानेच वडिलांचा निर्घृण खून केला. मुलाने 85 वर्षीय वडिलांवर चाकूने हल्ला करुन डोक्यात वरवंटा घातला. या घटनेने संपूर्ण पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. 

शंकर बोराडे असं हत्या झालेल्या वडिलांचे नाव आहे. तर शेखर बोऱ्हाडे (46) या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घरगुती वादातून हा प्रकार घडला असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राजगुरुनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान नवीन वर्षात पुण्यात आपल्या जन्मदात्याची हत्या करण्याची ही तिसरी घटना आहे. याआधी पुण्यातील धनकवडीत आणि इंदापुरातही अशा घटना उघडकीस आल्या आहेत. पुण्याच्या धनकवडी परिसरात एका बेचाळीस वर्षाच्या व्यक्तीने आईचा खून करून नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली.

तर इंदापुरात दोन दिवसांपूर्वीच जमिनीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून करून मुलाने वडिलांवर ही प्राणघातक हल्ला केला. आई-वडील पैसे देत नाहीत या कारणावरून हा प्रकार घडला होता. पुणे जिल्ह्यात नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच घडलेल्या या तीन घटनांमुळे मोठी खळबळ उडाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.