लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ अपलोड व शेअर; दोन गुन्हे दाखल

0

पिंपरी : लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ अपलोड तसेच शेअर केल्याप्रकरणी वाकड आणि चिंचवड पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नॅशनल सेंटर फॉर मिसींग अँड एक्सप्लॉईड चिल्ड्रेन (एनईएमईसी) यांच्याकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वाकड पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजीसिंह कुंदनसिंह ठाकूर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार 918928954515 मोबाईल क्रमांक, [email protected] मेल, स्क्रीन युझर नेम Ér0hit55, ESP User ID : 45252840327, NojiSk नामक 9021868019 मोबाईल क्रमांक धारक, स्क्रीन युझर नेम noji.sk, ESP User ID : 100005414981539, Profile URL http://www.facebook.com/noji.sk यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींनी अल्पवयीन मुलीचे अश्लील चित्रण करणारे साहित्य अपलोड केले. एनईएमईसी या केंद्रीय संस्थेच्या ही बाब निदर्शनास आली. संस्थेने महाराष्ट्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक तथा नोडल अधिकारी महाराष्ट्र सायबर मुंबई यांना ही माहिती पाठवली. त्यानंतर याचे तांत्रिक विश्लेषण करून घटना वाकड परिसरात घडली असल्याने वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिंचवड पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक एन जे तलवाडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजकुमार ([email protected] http:facebook.com/people/rajkumar-rajkumar /100045438005484) , +919970903927 ( love you 143), गिरजेश  भाई (girjeshbhai997 @gmail.com, http:facebook.com/people, +917397830123, [email protected], vinu parihar, +917020641433 धारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींनी त्यांच्या सोशल अकाउंटवरून लहान मुलांचे व मुलींचे व्हिडीओ सेंड केले. हा प्रकार एनईएमईसी या संस्थेच्या निदर्शनास आला. त्यांनी दिलेल्या गोपनीय टीपनुसार विशेष पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र सायबर मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या सूचनांनुसार चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.