18 वर्षाच्या तरुणीचे अपहरण करुन बलात्कार

0

पिंपरी : फॅशन डिझायनिंगच्या क्लासला जात असताना एका 18 वर्षाच्या तरुणीला जबरदस्तीने गाडीत बसवून पळवून नेले. तिच्यासोबत लग्न करून बळजबरीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात कल्याण पूर्व येथील संघर्ष संजय चाबुकस्वार (20) याच्या विरुद्ध आयपीसी 366, 376 2 (एन), 506, 504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी 18 वर्षे वयाच्या मुलीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 5 फेब्रुवारी 2022 ते 8 मे 2022 या दरम्यान आरोपीच्या कल्याण येथील राहत्या घरी व चिंचवड येथे घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत तरुणी फॅशन डिझायनिंगच्या क्लासला पायी जात होती. त्यावेळी आरोपीने तिला जबरदस्तीने गाडीत बसवून कल्याण पूर्व येथील त्याच्या घरी घेऊन गेला. त्यानंतर त्याने मुलीसोबत एका बौद्ध विहारात लग्न केले. लग्नानंतर मुलीची इच्छा नसताना शारीरिक संबंध प्रस्थापीत केले. पीडीत तरुणी गरोदर असून तिच्यावर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक टी. वाय. सय्यद करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.