lesbian hookup dating app free hookup app reddit hookup dating in india hookup sites that wirk free japanese wife sex video

पुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

0

पुणे : पुणे-सोलापूर रस्त्यावर कुरकुंभ परिसरात रस्ता ओलांडताना झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्देवी घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे. अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

सुखराज गौतम (35), छोटू मनू गौतम (5), मुकेश फकीर गौतम (11) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. अपघातात जिलेराम मोहन मोद (40), रिकी मनू गौतम (9), संतोष जिलेराम मोद (10) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. जखमींवर दौंडमधील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पसार झालेल्या ड्रायव्हरचा शोध‌ घेण्यात येत असल्याचे दौंड पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी सांगितले आहे.

गौतम कुटुंबीय मूळचे उत्तरप्रदेशामधील आहे. कुरकुंभ परिसरात नातेवाईकांना भेटण्यासाठी ते सर्वजण आले होते. आज म्हणजेच शनिवारी (27 नोव्हेंबर) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सर्वजण रस्ता ओलांडत होते. त्या वेळी सोलापूरकडे जाणाऱ्या भरधाव वाहनाने गौतम, आणि इतरांना यांना धडक दिली. अपघाताचा आवाज ऐकून ग्रामस्थ तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच सुखराज गौतम, छोटू गौतम, मुकेश गौतम यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक सुशील लोंढे तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.