देशात ‘यांच्या’साठी सुरु आहे ‘बूस्टर डोस’

0

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि ६० वर्षांवरील व्यक्तींना बूस्टर डोस देण्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. नॅशनल हेल्थ मिशनचे अतिरिक्त सचिव आणि मिशन डायरेक्टर विकास शील यांनी सांगितले की, ‘बूस्टर डोस’साठी ऑनलाइन अपॉइंटमेंटची सुविधा को-विनवर देण्यात आली आहे. जे बूस्टर डोस घेण्यास पात्र आहेत त्यांनी ऑनलाईन अपाईंटमेंट घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की कोरोना लसीचा बूस्टर डोस घेण्यासाठी नवीन नोंदणीची आवश्यकता नाही. ज्या लोकांना COVID-19 लसीचे दोन डोस मिळाले आहेत ते कोणत्याही लसीकरण केंद्रात थेट लस घेऊ शकतात किंवा वॉक-इन लसही घेऊ शकतात. 10 जानेवारी म्हणजे उद्यापासून देशात बूस्टर डोस देण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील कमी प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना तिसरी लस म्हणून बूस्टर डोस देण्याची घोषणा केली होती.  आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन कर्मचार्‍यांना देखील लसीचा बूस्टर डोस दिला जाईल. 

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांना नवीन नोंदणी करण्याची गरज नाही. त्या व्यक्तीला केवळ लसीसाठी लसीकरण केंद्रात अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे. जर त्याला कोणत्याही कारणास्तव अपॉइंटमेंट घेणे शक्य नसेल तर तो थेट लसीकरण केंद्रात जाऊन लस घेऊ शकतो.

भारतात येत्या 10 जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि 60 वर्षांहून अधिक वयोगटातील लोकांना लशीचा तिसरा म्हणजे बूस्टर डोस दिला जात आहे. यासाठी पात्र असलेल्या व्यक्तींनी आधी ज्या लसीचे दोन डोस घेतले आहेत. त्याच लसीचा बूस्टर डोस देण्यात येणार आहे. 

बूस्टर डोस देण्याबाबत आरोग्य मंत्रालयाने काही मार्गदर्शक तत्वेही प्रसिद्ध केले आहेत. 

– Comorbidity असल्याचे दाखवण्यासाठी डॉक्टरांचे प्रमाणपत्र, प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बुस्टर डोस घेण्यात यावा 

– ज्यांनी दुसरा डोस घेऊन 9 महिने झाले असतील अशांना हा बुस्टर डोस देण्यात येणार आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.