“नॉन स्टॉप 150 भाग पुर्ण करणारी महाराष्ट्रातील एकमेव वेबसिरिज चांडाळ चौकडी”

0

सातारा : नवनाथ मोहन ढमे दिग्दर्शित माळरान प्रोडक्शन निर्मित चांडाळ चौकडी या मराठमोळी वेबसिरीज ने नुकतेच 150 भाग पूर्ण केले आहेत .
“अस एक बी गाव नाय
जिथं चांडाळ चौकडीचे नाव नाय”
या वाक्याप्रमाणे महाराष्ट्रातील प्रत्येक गावात,प्रत्येक घरातील लोकांच्या हृदयात चांडाळ चौकडी आपले नाव कोरले आहे.फक्त महाराष्ट्रातच नाही तर जिथे जिथे मराठी प्रेक्षक आहेत अशा 40 ते 50 देशामध्ये चांडाळ चौकडी पहिली जाते .

युट्यूब वरील वेबसिरिजच्या इतिहासात नॉन स्टॉप दीडशे भाग पूर्ण करणारी वेबसिरीज म्हणून नवा विक्रम नवनाथ ढमे यांनी या माध्यमातून केला आहे.
तब्बल तीन वर्षे नॉनस्टॉप चालू असणाऱ्या या वेबसिरीज चा पहिला भाग छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी म्हणजे 19 फेब्रुवारी 2019 ला प्रदर्शित झाला .
आणि आजपर्यंत न थांबता अखंडपणे  ही सिरीज चालू आहे आणि पुढेही चालू राहील .हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता ,या काळात अनेक अडचणी आल्या ,अनेक कलाकार सिरीज सोडुन गेले पण दिग्दर्शक नवनाथ ढमे यांनी खचून न जाता नवीन कलाकार घेऊन ही सिरीज तितक्याच ताकतीने चालू ठेवली .

गाव,खेडे, वाडी वस्तीवर लोकांत मध्ये या मालिकेबद्दल आपुलकी,जिव्हाळा,प्रेम दिसून येतो.तीन वर्षे एकाच गोष्टीत सातत्य ठेवणे कठीण असते मात्र  तीन वर्षात एकही भाग न चुकता ह्या मालिकेचे भाग प्रदर्शित होत गेले.या दरम्यान २ लॉक डाऊन होऊन गेले,अनेक कलाकार प्रसिध्दी मिळाल्या नंतर वेगळे होऊन त्यांनी स्वतःचा वेगळा संसार थाटला मात्र लोकांचे मनोरंजन झाले पाहिजे,सामाजिक प्रबोधन झाले पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवत ह्या मालिकेचे काम थांबले नाही.विशेष बाब म्हणजे तीन वर्षात वेगवेगळे १५० भाग झाले मात्र कुठल्याही विषयाची पूनार्वृत्ती एकदाही झाली नाही हे उल्लेखनीय आहे.

नुकतीच नवनाथ ढमे दिग्दर्शित करत असलेली निर्माते प्रतिकुमार शहा यांची जुगलबंदी वेब सीरिजचा एक भाग प्रदर्शित झाला आहे ही मालिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.