‘फिटनेन्स वेडा’ पोलीस अधिकारी; आठ तासात देहू ते पंढरपूर सायकल वारी

0

पिंपरी : पोलीस म्हटलें की त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा नागरिकांचा फारच वाईट असतो. मात्र याला छेद देण्याचे काम पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाने केले आहे. यामुळे पोलीस खात्याची प्रतिमा समाजात चांगली होण्यास मदत झालेली आहे. स्वतःच्या शरीरावर आणि व्यायामावर प्रेम करणाऱ्या ‘फिटनेन्स वेड्या’ पोलीस अधिकाऱ्याने सायकल वारी केली आहे. देहू ते पंढरपूर या पालखी मार्गावर तब्बल आठ तास सायकल चालवत समाजाला आणि स्वतःच्या पोलीस खात्याला ‘फिटनेन्स’चे महत्व समजावले आहे.

धावत्या युगात आणि वेगवेगळ्या आजारांमध्ये स्वतःची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पौष्टिक आहार आणि योग्य व्यायाम हा महत्वाचा आहे. रनिंग, स्विमिंग, सायकलिंग असे वेगवेगळ्या प्रकारच्या व्यायामाने स्वतः फिट राहणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे राम गोमारे. ते सध्या हिंजवडी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी कार्यरत आहेत.

राम गोमारे यांनी गेली दोन वर्षांपासून मेहनत घेत सायकलिंग, स्विमिंग आणि रनिंग असा व्यायाम सुरू ठेवला आहे. राम गोमारे यांनी स्वतः तर धडधाकट राहूच पण पोलीस सहकारी, इतर मित्रांना देखील फिटनेसचे महत्त्व पटवून देऊ असे गोमारे यांनी म्हटले आहे. हे महत्त्व पटवून देण्यासाठी देहू ते पंढरपूर असा सायकलवरून प्रवास करायच ठरवले होते. देहूमध्ये संत तुकाराम महाराज यांच्या मंदिरात दर्शन घेत गोमारे यांनी पंढरपूरपर्यंत सायकल प्रवास केला आहे. केवळ एका ठिकाणी दहा मिनिटांचा थांबा घेत गोमारे यांनी पंढपूर गाठले आहे.

सलग आठ तास सायकल चालवत राम गोमारे यांनी देहू ते पंढरपूर असा २३४ किलोमीटर प्रवास केला आहे. त्यामुळे गोमारे यांनी पंढरपूर पर्यंत फिटनेस वारीच केली आहे. करोनाकाळात पौष्टिक आहार आणि योग्य व्यायाम करणं गरजेचं असल्याचं सांगत राम गोमारे यांनी दररोज किमान एक तास स्वतःसाठी देऊन व्यायाम करण्याचे आवाहन केले आहे.

राम गोमरे यांनी यापूर्वी अनेक रनिंग स्पर्धेत भाग घेतला आहे. 52 किलोमीटर रनिंगच्या स्पर्धेत भाग घेऊन आपण फिट असल्याचे सिद्ध केले आहे. गोमरे हे पोलीस खात्यातील कामाच्या व्यापातून वेळ काढून नियमित व्यायाम करतात. सर्वांनी दररोज किमान एक तास व्यायाम करणे आवश्यक असल्याचा सल्ला गोमारे यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.