पहिल्यांदाच महाबळेश्वर आणि पाचगणीचे तापमान ‘शून्य’ अंशावर

0

पुणे : राज्यात थंडीचा कडाका वाढला असून महाराष्ट्राचे ‘मिनी काश्मीर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर आणि पाचगणीचे तापमान शून्य अंशावर आले आहे. शुक्रवारी पहाटे महाबळेश्वरमधील वेण्णा तलाव आणि लिंगमळा भागात तापमान शून अंशांपर्यंत खाली आल्याचे पहायला मिळालं. पुढील दोन दिवस किमान तापमानात फारसा बदल नसल्याने या काळात थंडीचा कडाका कायम राहणार आहे.

दोन दिवसांनंतर किमान तापमान 2 ते 3 अंशांनी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागकडून (IMD) व्यक्त करण्यात आहे. गुरुवारी महाबळेश्वर येथे दिवसाचे तापमान सर्वात कमी 19 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. तर विदर्भात आणखी दोन दिवस पावसाळी वातावरण कायम असून, त्यानंतर याठिकाणी हवामान कोरडे होईल.

गुजरात, मध्य प्रदेशात थंड दिवसांची स्थिती असल्याने मुंबईसह कोकण विभाग आणि उत्तर महाराष्ट्रातील गेल्या तीन दिवसांपासून किमान तापमानात मोठी घट झाली आहे. परिणामी या ठिकाणी थंडीचा कडाका वाढला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही किमान तापमान सरासरीखाली येऊन थंडी वाढली आहे. दोन दिवसानंतर उत्तरेकडील थंडीची लाट ओसरणार आहे.

पश्चिमी चक्रवात तयार होणार असून याचा परिणाम राज्यातील किमान तापमानात 2 ते 3 अशं सेल्सिअसने वाढणार आहे. सध्या कर्नाटक ते दक्षिण छत्तीसगडपर्यंत कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. त्यामुळे या पट्यात काही भागात पाऊस होत आहे. त्याचा परिणाम विदर्भावरही होत असून या भागात पुढील दोन दिवस पावसाळी वातावरण कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुण्यात तापमानाची घट झाल्याचे पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी तापमान 15 अंशाखाली आले आहे.

राज्यात काही भागामध्ये ढगाळ वातारवरण निर्माण होत आहे. यातच उत्तरेकडून थंड वारे येत आहे. या दोन्हीचा परिणाम म्हणून राज्यात कमाल तापमानात मोठी घट झाल्याचे पहायला मिळत आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे, महाबळेश्वर, नाशिक, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी कमाल तापमान सरासरीपेक्षा 3 ते 7 अंशांनी कमी झाले आहे. कोकण विभागात मुंबई परिसर आणि रत्नागिरीत कमाल तापमान सरासरीपेक्षा 2 ते 3 अंशांनी कमी आहे.
मराठवाडा, विदर्भातही ते सरासरीच्या तुलनेत 3 ते 5 अंशांनी कमी आहे. राज्यात बहुतांश भागात कमाल तापमान 25 अंशांच्या खाली आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.