‘या” बँकेत खाते असेल तर मिळेल 2 लाख रुपयांचा विमा

0

 

नवी दिल्ली : तुमचे बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) असेल तर, तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. एसबीआय आपल्या ग्राहकांसाठी 2 लाख रुपयांपर्यंत मोफत विमा देत आहे. या विम्याशी संबधित सर्व माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्यानंतर तुम्हीसुद्धा या विम्याला क्लेम करू शकता.

ज्या ग्राहकांचे एसबीआयमध्ये जन धन खाते आहे आणि Rupay डेबिट कार्ड आहे. त्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचा मोफत विमा कवर मिळतो. जनधनच्या ग्राहकांना रुपे कार्डची सुविधा देण्यात येते. या कार्डवर बँक ग्राहकांना 2 लाखापर्यंतचा अपघाती विमा मिळतो. रुपे कार्डच्या मदतीने तुम्ही एटीएम मधून पैसे काढू शकता. तसेच खरेदीविक्री देखील करू शकता.

बेसिक सेविंग खात्याला जन धन खात्यामध्ये ट्रान्सफर करण्याचा पर्याय तुमच्याकडे उपलब्ध असतो. ज्यांच्याकडे जन धन खाते आहे. त्यांना रुपे कार्ड मिळते. 28 ऑगस्ट 2018 पर्यंत उघडण्यात आलेल्या जनधन खात्यांवरील रुपे कार्डवरील विम्याची रक्कम 1 लाख रुपये आहे. 28 ऑगस्ट 2018 नंतरच्या रुपे कार्डवर 2 लाख रुपयांपर्यंतचा अपघात विम्याचे संरक्षण मिळते.

Leave A Reply

Your email address will not be published.