राज्यात गेल्या 24 तासात 46 हजार 723 नव्या कोरोना रुग्णांची भर

0

मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग  मागील काही दिवसांपासून वाढत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 46 हजार 723 नव्या रुग्णांची भर पडली असून 32 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 28 हजार 041 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात मंगळवारी 34 हजार 424 रुग्णांची नोंद झाली होती. त्या तुलनेत आज जवळपास 12 हजार अधिक रुग्णांची भर पडल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे राज्याच्या चिंतेत भर पडली आहे. राज्यात आज 86 ओमायक्रॉनबाधित रुग्णाची नोंद झालेली आहे.

राज्यात आज 28 हजार 041 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 66 लाख 49 हजार 111 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.52 टक्के झाले आहे. राज्यात आज 32 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत 1 लाख 41 हजार 701 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर 2.01 टक्के झाला आहे.

राज्यात आजपर्यंत 7 कोटी 11 लाख 42 हजार 569 प्रयोगशाळा तपसण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 70 लाख 34 हजार 661 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 9.85 टक्के आहे. सध्या 2 लाख 40 हजार 122 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 15 लाख 29 हजार 452 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 6951 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

#Maharashtra #COVID19 Updates for today

*⃣New Cases – 46,723
*⃣Recoveries – 28,041
*⃣Deaths – 32
*⃣Active Cases – 2,40,122
*⃣Total Cases till date – 70,34,661
*⃣Total Recoveries till date – 66,49,111
*⃣Total Deaths till date – 141701
*⃣Tests till date – 7,11,42,569

(1/6)🧵

— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) January 12, 2022

Leave A Reply

Your email address will not be published.