भारताने पाकिस्तान समोर 151 धावांचा डोंगर उभारला

0

दुबई : आज सुरु असलेल्या रोमहर्षक क्रिकेट सामन्यात भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी152 धावांचे आव्हान ठेवले आहे. हे आव्हान पाकिस्तान पुर्ण करते की भारत हा सामना जिंकतो याकडे संपूर्ण देशातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

भारताची सुरूवात काहीसी खराब झाली.विराटने ५ चौकार आणि एका षटकारासह ५७ धावा केल्या. पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली आहे. त्यामुळे भारत प्रथम फलंदाजीला उतरेल.

भारतीय संघाचा हा यंदाच्या टी -20 विश्वचषकातील पहिलाच सामना आहे. पाकिस्तानचाही हा पहिलाच सामना असल्याने दोन्ही संघ पहिला विजय मिळवून स्पर्धेची चांगली सुरुवात करण्याच्या तयारीत आहेत. दोन्ही संघानी अंतिम 11 जाहीर केले आहेत.

सूर्यकुमार यादवही यष्टीरक्षकाच्या हाती हसन अलीच्या चेंडूवर झेलबाद झाला आहे. केएल राहुलही त्रिफळाचीत होत तंबूत परतला आहे. विशेष म्हणजे शाहीन आफ्रिदीनेच त्याचीही विकेट घेतली आहे. भारताचा सलामीवीर रोहित शर्मा पहिल्याच षटकात शाहीन आफ्रिदीच्या चेंडूवर तंबूत परतला आहे.

प्रथम फलंदाजी आली असल्याने भारताचे फलंदाज मैदानात आले आहेत. सध्या केएल राहुल आणि रोहित शर्मा मैदानात आहेत. नाणेफेक जिंकत पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी निवडली आहे.

भारत: केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह

पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरीस रौफ

Leave A Reply

Your email address will not be published.