काटे स्पोर्टस क्लब ठरला ‘अटल करंडक’चा मानकरी

0
  • पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील क्रिकेटपट्टूना प्रोत्सान देण्यासाठी व आपल्या शहरात राष्ट्रीय खेळाडू तयार होण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. असे संयोजक नवनाथ ढवळे यांनी सागींतले.आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सुचनेनुसार आणि माजी नगसेवक शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी पुनावळे शाखा व नवनाथ ढवळे मित्र परिवार यांच्या वतीने पुनावळे येथे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने “अटल करंडक” क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .

    मागील चार दिवसांपासून स्पार्क क्रिकेट ग्राऊंड वर स्पर्धा सुरू होती. स्पर्धेत पुनावळे , ताथवडे येथील एकून 32 संघानी भाग घेतला होता. यामध्ये प्रथम क्रमांक काटे स्पोर्ट क्लब यांनी मिळविला. द्वितीय क्रमांक ओम साई क्रिकेट क्लब यांनी तर तृतीय क्रमांक जानता राजा क्रिकेट क्लब यांनी मिळविला. शिस्तबद्ध संघ माळवाडी ईलेवन,बेस्ट बॅालर नागेश बिराजदार , उत्कृष्ट फलंदाज सचिन गवळी, ऊत्कूष्ट क्षेत्र रक्षक हर्षद शिंदे, यांनी पदके मिळविली.

    सामन्याचे समालोचन दिनेश मदरे,सचिन मादंळे, मारुती दर्शले, बाळू काटे, यांनी केले. यावेळी युवा नेते नवनाथ ढवळे, रामदास कस्पटे , सुरेश रानवडे , विजय दर्शले , भरत काटे, अंकूश गायकवाड, राहूल काटे, अमित गोरे, प्रशांत जगताप, बाजीराव बहिरट विजय काटे, अनिल बांदल, महेश बांदल, दिपक आडसुरे,आदी मान्यवर उपस्थित होते.

    संयोजन कमिटी मध्ये – मल्हारी मुसुडगे ,दिनेश मदरे,प्रणीत ढवळे, भैरव यादव,आकाश ढवळे, प्रशांत ढवळे, गितेश बोरगे,सौरव ढवळे, आशिष गायकवाड, रूषीकेश ढवळे, सौरव काटे, आकाश गायकवाड,गणेश गाडेकर, किरण बारसकर,हे मेंबर होते. तसेच गायरान क्रिकेट क्लब याचंही सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.