भोसरी आणि निगडी परिसरातून मोठ्या प्रमाणावर गुटखा जप्त

0

पिंपरी : भोसरी आणि निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करुन सामाजिक सूरक्षा पथकाने सुमारे 6 लाख 13 हजार रुपये किंमतीचा गुटखा आणि ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी करण्यात आली.

भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत लांडगे वस्ती येथे अभिजीत उर्फ पप्पू भोर याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता गुटखा नवनाथ लांडगे याचे रुममध्ये ठेवल्याचे सांगितले. त्याचे कडून 1,00,600 किमतीचा गुटखा व 1,20,000 किमतीचे एक चारचाकी वाहन असा एकूण 2,20,600 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून उत्तम वाघमारे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी गुटखा गणेश पवळे याच्या रुममध्ये साठवणूक केला असल्याचे सांगीतले. तर मालक विलास ससाणे यांचे सांगणेवरुन गुटखा विक्री करता असल्याचे सांगितले. त्याचे ताब्यातून 3,15,145 किमतीचा गुटखा, 8500 रोख रक्कम व 70,000 किमतीची एक दुचाकी असा एकूण 3,93,685 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे प्रमुख पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, सहायक निरीक्षक अशोक डोंगरे यांच्या पथकांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.