free flirt hookups free hd xxx sex com cruise ship hookup app hookup app reddit best hookup website 2021

पब, पार्टी आणि पेंग्विनमुळे महाराष्ट्राची बदनामी’….नवाब मलिक यांचे प्रत्युत्तर

0

मुंबई : पब, पार्टी आणि पेंग्विनमुळे महाराष्ट्राची बदनामी झाली अशी टीका भाजप आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर केली होती. शेलार यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पब, पेग आणि पार्टीत सरकार मग्न म्हणता, पार्टीत कोण असंत, पबला कोण असतं, हे आम्हाला काढायला लावू नका, आमच्याकडे सगळ्यांची माहिती आहे, असे प्रत्युत्तर नवाब मलिक यांनी शेलार यांना दिले आहे.

ठाकरे सरकारच्या दोन वर्षांच्या कामगिरीवर भाजप आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन टीका केली होती. त्यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. नवाब मलिक यांनी शेलार यांच्या टीकेला उत्तर देताना मोदी सरकारवर निशाणा साधाला आहे. दोन वर्षाच्या काळात सरकार अनेक समस्यांना तोंड देत सरकार इथपर्यंत पोहोचलं. कोविड काळात राज्य सरकारने केंद्रापेक्षाही चांगलं काम केलं. तिथ मृतदेह नदीत वाहत होते, पण इथे आम्ही रुग्णांना वाऱ्यावर सोडले नाही, अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मागील दोन वर्षे सरकार पडेल असं बोलून भाजप थकलं आहे. आता त्यांच्याकडे बोलायला काही राहीलं नाही, असा टोला मलिक यांनी शेलार यांना लगावला. केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन कुणालाही सरकार स्थापन करता येत नाही. हे भाजपला आतापर्यंत कळायला पाहिजे होते. आम्ही ठाम आहोत सरकार चालेल, आणि काहीही झालं तरी पडणार नाही, असं मलिक यांनी ठणकावून सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.