पोलीस कॉन्स्टेबल बनल्या ‘मिस महाराष्ट्र’

0

मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या आणि एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्रतिभा सांगळे यांनी ‘मिस महाराष्ट्र’चा किताब पटकावला आहे. बीडमध्ये महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या प्रतिभा सांगळे यांनी ही स्पर्धा जिंकल्यानंतर सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. कुस्तीपटू पोलीस दल आणि मिस महाराष्ट्र असा सांगळे यांचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे.

प्रतिभा सांगळे यांनी पोलीस दलात कर्तव्य पार पाडत असताना मिस महाराष्ट्र हा किताब पटकावला आहे. सांगळे या मूळच्या आष्टी तालुक्यातील असून त्या 2010 पासून बीड पोलीस दलात  कार्यरत आहेत. सध्या त्या बीड पोलीस मुख्यालयात महिला कॉन्स्टेबल म्हणून कर्तव्य बजावत आहेत.

पोलीस दल, कुस्ती आणि मॉडलिंग या सगळ्या गोष्टींची सांगड घालत त्यांनी ग्रामीण भागातील महिलांसमोर एक आदर्श घालून दिला आहे. प्रतिभा यांना मागील अनेक वर्षापासून एखाद्या सौंदर्य स्पर्धेत सहभागी होण्याची इच्छा होती. यापुढे मिस इंडिया युनिव्हर्सचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी आपली पुढची तयारी सुरु ठेवली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.