पैसे उकळणारा ‘तो’ मनी लॉन्ड्रिंगमधला मोठा मासा

0

मुंबई : मुंबई ड्रग्ज पार्टी प्रकरणात दररोज वेगवेगळ्या घडामोडी समोर येत आहेत. २५ कोटींची मागणी सॅम डिसुजा नावाच्या मध्यस्थामार्फत करण्यात आली होती. सॅम डिसुजा हा मुंबईच्या मनी लॉन्ड्रिंगमधला सर्वात मोठा मासा आहे. हा सर्वात मोठा खेळ आहे आणि तो आता सुरु झाला आहे असे  शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हंटले आहे.

आर्यन खान ड्रग्ज पार्टी प्रकरणात दररोज वेगवेगळे खुलासे समोर येत आहेत. अशातच रविवारी (२४ ऑक्टोबर) या प्रकरणातला एनसीबीचा मुख्य साक्षीदार किरण गोसावीच्या बॉडीगार्ड प्रभाकर साईलने मोठा गौप्यस्फोट केला. ज्यात प्रभाकरने सॅम डिसुजा नावाच्या व्यक्तीचाही उल्लेख केला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण वेगळ्याच मार्गावर गेले आहे. मात्र प्रभाकर साईलच्या या धाडसाचे संजय राऊत यांनी कौतुक करत त्याला राज्यसरकारच्या गृहखात्याने संरक्षण द्यावे अशी मागणीही केली आहे.

पण, प्रभाकरच्या धाडसाचं कौतुक केलं पाहिजे. त्याने केलेला खुलासा हा देशावर केलेले सर्वात मोठे उपकार आहेत. प्रभाकरचं काम खुप मोठ आहेत, तो खरा देशभक्त आहे. ज्यांनी देशभक्तीचा खोटा मुखवटा घातला होता, त्यांचा मुखवटा प्रभाकरने केलेल्या खुलाशांमुळे फाटला आहे. आता त्याला राज्यसरकारच्या गृहमंत्रालयाने सुरक्षा देणे ही राज्यसरकारची जबाबदारी आहे. याशिवाय प्रभाकरने व्हिडीओमध्ये केलेल्या सर्व खुलाशांची एसआयटी कमिटी गठित करुन चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.